कविता- असाच एक दिस असावा

श्रावण 

ऋतू हिरवा...! ऋतू बरवा...! पावसाळा. त्यात श्रावण म्हणजे कहर. बालकवींनाही मोहिनी घालणारा हा श्रावण, खरं तर ऋतूंचा राजा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. वसंताचा आपलाच रुबाब, पण श्रावणात फुलणार्या रानफुलांचा, गवतफुलांचा ज्याला लळा लागला त्यालाच पुसावे, श्रावण म्हणजे काय...?

 असाच एक दिस असावा

असाच एक दिस असावा
माझ्या सोबत मीच असावा
दूर वनी श्रावणसरी
ऊन-पावसाचा खेळ असावा

हिरव्या पिवळ्या गालिच्यावर
रानफुलांचा साज असावा
खळखळणार्या पाटाचा
सोबतीला नाद असावा

पानावरल्या थेंबाला
रविकिरणांचा छेद असावा
लाखमोलाचा ऐवज तो
कधीतरी मज दिसावा

असाच एक दिस असावा
माझ्यासोबत मीच असावा
श्रावणातल्या कैफात
माझ्यातला मी हरवावा

असाच एक दिस असावा
असाच एक दिस असावा

_विजय सावंत

फोटो- विजय सावंत











Comments

  1. कथा ,कविता आणि सुंदर फोटोग्राफी
    सर्व एकाच ठिकाणी हा दुर्मिळ योग
    खूप छान मित्रा

    ReplyDelete
  2. विजुभाऊ कवितेमधून आणि तुझ्या फोटोग्राफी मधून,
    तु श्रावणातला तो दिवस जगलास तुला तो दिवस मिळाला पण आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  3. असाच एक दिवस असावा.
    अप्रतिम !
    श्रावणातल्या दिसात न्हालो.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  4. तुला तर नेहमीच मिळतो तो दिवस . मस्त कविता

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!☺️

      Delete
  5. तुमच्या फोटोसाठी श्रावण बहरावा व आम्हाला फोटोतुन दिसावा!मस्त ,सुदंर फोटो!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment