आणि बरंच काही...हुश्श!
हुश्श!
सकाळी लवकर उठावे लागते हल्ली. मुलं उठायच्या आधी पोहे तयार करून ठेवावे लागतात. वरून धाकल्याकडून हेही ऐकावं लागतं, “रोज रोज काय कांदापोहे!".
सांगावं लागतंं, “ रोज काय नवीन करून घालणार, मावशी नाही माहिती आहे ना!"
बरं दुसरं काय करावं तेही सुचत नाही. तरी धाक दाखवून ठेवलाय, ‘ उद्या परिस्थिती बिघडली तर पेजेच्या पाण्यावर राहावं लागेल.'
सगळ्यांच्या नाष्ट्याच्या डीश वॉशबेसीनमध्ये पडतात, तोपर्यंत दुपारच्या जेवणाचं बघावं लागतं. कुकर लावताना तांदळातलं पाण्याचं प्रमाण पुन्हा पुन्हा तपासावं लागतं; डाळ तिखट करावी की गोड, भाजी उभी चिरावी की आडवी हे ठरवायला तास गेल्यानंतर तासाभरात जेवणही तयार होते. फोडणीच्या तडक्याने बिल्डिंग हादरून जाते; जाते तर जाते आपल्या काय त्याचे. त्रास होतो म्हणून जेवायला थोडच बोलाविणार आहेत. चौथ्या किंवा पाचव्या वेळेला टाकलेले मीठ परफेक्ट लागते. मुलं शाळेने घरी करायला दिलेल्या होमवर्कमध्ये डोकं घालून असतात. “भूक लागेल तेव्हा जेवायला घ्या आपल्या हाताने" असं सांगून आता कुठे पुस्तकामध्ये व्हाया मोबाईल डोकावायला मिळते.
संध्याकाळी चहाबरोबर बिस्किटे असतात; पण काही वेळानेच ‘भूक लागली, काहीतरी खायला द्या!' सुरु होतं. एका टोपात चुरमुरे, चणे, शेंगदाणे, कांदा टॉमेटो बारीक चिरून मिसळून भेळ बनवली की वेळ मारून नेता येते.
भाताचं ठीक आहे पण रात्री पुन्हा ताजी आमटी, भाजी हे म्हणजे ह्या दिवसात जरा अतीच होते. अगदीच गेला बाजार कांद्याची किंवा बटाट्याची भजी काढून दिली की आपल्यावर आळशी असल्याचा शिक्का बसत नाही एवढंच.
रात्री सगळं आटोपल्यावर बेडवर पडताना ‘हुश्श' करणार तोच उद्यासाठी काहीतरी भिजत घालायला पाहिजे ते आठवते, आणि मग कांदापोहे ऐवजी दुसरं काय देता येईल हा विचार करता करताच निद्रादेवीशी संधान साधलं जातं.
हुश्श!
हे ‘हुश्श' आहे रुग्णालयात कर्मचारी असणार्या तमाम स्त्री वर्गाच्या नवर्यांचं.
विजय सावंत

Comments
Post a Comment