कविता- नातं
नातं
नाळ कापताच
नाती चिकटतात
त्यातली काही तर
काहीच कामाची नसतात
नातं कसं खास असावं
आठवण नसल्यास क्षणभर रुसावं
दिवसभराच्या रहाटगाडग्यात
एकदा तरी स्मरावं
नसेना का रक्ताचं
आपुलकीचं असावं
हृदयाच्या कोपर्यात
ठाण मांडून बसावं
असावं नातं दृष्ट लागणारं
मंद सुगंधात भिजून निघणारं
ठेच लागताच हुंदका देणारं
अन् काळालाही पुरून उरणारं
© विजय सावंत



सुंदर.. ��
ReplyDelete