कविता- आठवणी



आठवणी

आठवणी या वेड्या अशा का वागतात
नको नको म्हणताना मागे मागे लागतात

समजावणंही नसतं आपल्या हातात
म्हणतात आम्हालाही भिजायचंय पावसात

बरं गेलं जरी पावसात आणिक गोळा होतात
अन् मग समजावता समजावता कित्येक दिवस निघून जातात

वेड्या आठवणी अशाच असतात

@ विजय सावंत
सेलफोन फोटो - विजय सावंत

Comments