कविता- गुढीपाडवा शुभेच्छा



ऊंच ऊंच आकाशी काठी
केली त्यावर पालथी लोटी
कडूनिंबाची महिमा न्यारी
बताशाची सुमधुर गोडी

शुभ्र चाफ्याची माळ कशी
खणासंगे नटली थटली
मंद मंद समईच्या वाती
पाटाभवती रांगोळी सजली

उभी पाहा ती दारोदारी
मराठमोळी गगननभरारी
मंगलमय तोरण दारी
सौख्य नांदते घरोघरी

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या
शुभेच्छा!

विजय सावंत
२५/०३/२०२०

Comments

Post a Comment