कविता- माझी आई
आई
घरात लहान मूल जन्माला येणं म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. वातावरणच बदलून जातं घरातलं. ते जसजसं मोठं होत जातं, त्या लहान बाळाच्या लीलांनी घरही सुखावून जातं. तो आनंदोत्सव साजरा होत असताना अचानक एक दिवस ती बोबडी हाक कानावर पडते... आsssई...! बाळाची ही पहिली हाक ती माऊली अगदी श्वास रोखून कानात साठवून ठेवते... काय करू नि काय नको असे होऊन जाते तिला... बाळाला घट्ट छातीशी कवटाळते आणि पुन्हा पुन्हा त्या बाळाकडून तो शब्द वदवून घेते... बाळालाही कळालेले असते आपल्या आईला खूप आनंद झाला आहे... आपल्या बोबड्या बोलीत ते पुन्हा हाक मारते, आsssई...! ब्रम्हानंदी टाळी.
आईची महती काय वर्णावी! कितीतरी महान व्यक्तींनी आपल्या परीने गुणगान केलं आहे तिचं. कोणाला वाटतं, ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी', तर कोण म्हणतं,‘चाईल्ड गिव्हज बर्थ टू अ मदर'...खरंच! एका स्त्रीचा आई म्हणून जन्म झाल्यावर ती स्त्री इतर नाती कमीच पण आई म्हणूनच जास्त जगते. तिच्या डोक्यात फक्त फक्त आणि फक्त आपल्या बाळाचेच विचार असतात. ती चौकस असते पण केंद्रस्थानी फक्त आईच असते. तिचं बाळ कधीच मोठं होत नाही तिच्यासाठी. नऊ महिने उदरात असताना जुळलेली ती नाळ तिच्या जिवात जीव असेपर्यंत जुळलेली असते.
आठवा!, तुम्ही आईजवळ काही मागितलं आणि ते तुम्हाला मिळालं नाही, बनवा यादी अशा वस्तूंची... त्याक्षणी नाही पण पुढे कधीतरी ती वस्तू आईने तुम्हाला आणून दिलेली असते. त्यामुळे ही यादी कोरीच असेल सर्वांची... आपण कित्येकदा वाचतो ‘आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे निखळ प्रेम, आई म्हणजे गुरू...', पण मी एकाच शब्दात म्हणेन...!, आई म्हणजे ‘सबकुछ.'
आज आयुष्याच्या मध्यावर आलेलो असताना...
या दुनियेचा हा पसारा
वाटते सोडून तो द्यावा
घ्यावा घडीभर जरासा
आईच्या कुशीत विसावा
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तिच्या कर्तृत्वाला, तिच्या मातृत्वाला सलाम!🙏
माझी आई
इवल्या हृदयातील स्पंदनं
साद घालती दूर आई
कोजागिरीच्या चांदण्यात
धाव घेई एक आई
जुलुमी दुर्जनांच्या नाशा
जन्म घेई थोर जिजाई
शिवबाच्या पुण्य अवतारी
जन्म देतसे एक आई
तोडुनी जिवाचा लचका
देई देवकी एक अभागी
लावुनी जीव तयाला
धन्य होई यशोदामाई
बांधुनी पाठीशी बाळा
शिरे रणांगणी एक आई
होई अजरामर जगी या
झाशीची राणी लक्ष्मीबाई
नसे ठाऊक कुणा जरी
जनमाणसांत ही आई
हिमालयाहून उत्तुंग आहे
मजसाठी माझी आई
_विजय सावंत
१०/०५/२०२०



अप्रतिम आई...
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Deleteआई बद्दल अजून लिहायला हवे होते. आई हा विषय आणि आजच्या दिनाचे औचित्य साधले गेले आहे. माझ्या आईची आठवण आली. हे या लेखाच आणि कवितेचं यश आहे. धन्यवाद सावंत सर ! 🙏
ReplyDeleteतुमच्या या सुंदर कमेंटसाठी मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteआभाळाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी उरते ती आई!
लिहायचंय, पुन्हा कधीतरी!🙏
❤️👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Delete👌🏻👌🏻👌🏻❤🙏🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteMother is a subject that is just not framed ..but just the way u have flowed..it is very amazing and sweet!!....khup sundar.🎊🎊🙏🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteसुंदर लेख..अप्रतिम
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteविजू भाई छान कविता
ReplyDeleteआईसाठी आभाळही कमी पडेल.काकींचा फोटो मस्त.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteReposted ?
ReplyDeleteAnyway,
ज्या आईची मुले कर्तृत्ववान आणि यशस्वी झाली त्यांचीच आठवण आणि उदाहरणे देण्यात येतात.
परंतु एका कृष्णाच्या जन्मापायी आपली सात पोटचे गोळे कंसाकडून आपटून मारली जातांनाचे दृष्य पाहतांना देवकीतील मातेची काय अवस्था झाली असेल ?
पती जमदग्नींच्या आदेशामुळे आपला मासांचा गोळा परशुरामाकडून शिरच्छेद होत असतांना त्या रेणुकामातेच्या मनाची काय बरें अवस्था असेल ?
व्यसनी, गुंड संजय दत्त नामक पुत्राला गोळ्या घालून ठार करतांना रिमा लागूतील आई कोणत्या मानसिकेतून गेली असेल?
जन्म, पालनपोषण आणि मृत्यूसुद्धा देणारी आई नावाचा जीव तयार करतांना त्या ईश्वराच्या उद्येशाचा थांग लागावा. तरच आई नावाचं कोडं सुटेल?
धन्यवाद विजय सावंत सर 🙏
आपल्यामुळे ह्या गहन विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली.
मातृदिनाच्या शुभेच्छा कोणी कोणाला द्याव्यात? त्या तमाम मातांना कि तमाम पुत्रांना ?🙏⚘
नेहमीप्रमाणे ही आगळीवेगळी प्रतिक्रिया, ज्याची मी वाट पाहात असतो. जुनी पोस्ट आहे, आज मातृदिनाच्या निमित्ताने पुन्हा पाठवली. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteहो जुनी पोस्ट असली तरी परत वाचायला मिळाली.
ReplyDeleteखुप सुंदर विजय
सुंदर
ReplyDelete