कविता- जिंदगी

जिंदगी

जिंदगी येईल समोर जशी
निधड्या छातीने झेलायची
जिद्द आपली जगायची
आपण नाही कधी सोडायची

बास नीतीमत्तेची थोडी
चाड तेवढी राखायची
हद्द खाली पडायची
आपणच आपली आखायची

जायचंय मला त्याच्यापुढे
म्हणून नाही त्याची खेचायची
घेऊन बरोबर साथ त्याची
एक नवी उंची गाठायची

येऊ दे मालिका संकटांची
सुईत घालून ओवायची
छानशी माळ सजवायची
गळ्यात घालून मिरवायची

धून आपल्या आयुष्याची
आपली आपण बनवायची
साथ सुटली जरी जगाची
सुरावट बाकी ठेवायची

© विजय सावंत
१९/०५/२०२०





Comments

Post a Comment