कथा- बुलेट
जरा हलकं फुलकं
बुलेट
लेबर रूममधून बाहेर येईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते. उशीर झाला होता. वर्षा आपली ड्यूटी संपवून घरी निघायच्या तयारीला लागली. अभयने घरी सोडू का विचारल्यावर ‘नको मी जाईन' म्हणाली. खाली उतरली, स्कूटीला स्टार्ट केली. गल्ली पाठी सोडून हायवेला लागली. हा नॅशनल हायवे रात्री दहानंतर सामसूम होतो. हॉस्पिटलपासून वर्षाचे घर जेमतेम चार किलोमीटर. त्या चार किलोमीटरमध्ये तीन किलोमीटरचा हायवे. दिवसा गाड्यांची वर्दळ असते पण रात्री मात्र किरकोळ गाड्यांशिवाय काही नाही. अगदी सामसूम. हायवेला लागल्यावर एक किलोमीटरवर टोल नाका लागतो. तो सोडल्यानंतरचा दोन कि.मी.चा रस्ता अगदीच निर्जन. खिंड पार केली की वस्ती सुरु होते. टोलनाका सोडून जेमतेम पाचशे मीटरच झाले असतील स्कूटी गचके देऊ लागली. पन्नास मिटरनंतर थांबली. वर्षा जबरदस्त टेन्शनमध्ये. अंधाराशिवाय तिथे कुणीच नाही. पौर्णिमेचं चांदणं होतं पण तेसुध्दा आता तिला काळंकुट्ट वाटू लागलं. चेहरा गोरामोरा. काय करावं सूचेना. पुन्हा पुन्हा स्टार्ट करून बघतेय पण छे!... पंधरा मिनिटे झाली...
एखादी गाडी झूsssम करून निघून जाई. त्या निर्जन ठिकाणी कुठलाही गाडीवाला थांबायला तयार नव्हता. काय माहीत ही बाई आपल्या टोळक्याबरोबर थांबली असेल तर...
वर्षाने मोबाईलची बॅटरी चालू करून गाडीतलं काहीच कळत नसताना तिला चारही बाजूंनी न्याहाळलं, मग फ्यूएल काट्याकडे बघितलं. काट्याने मान टाकलेली. सकाळी तर भरलं होतं...मग आठवलं, दुपारी गाडी हॉस्पिटलमध्ये काम करणारा नितीन घरी घेऊन गेला होता; त्याने गाडी पेट्रोल संपायला येईपर्यंत फिरवली असणार. गाडीत पेट्रोल नाही, मोबाईलमध्ये रेंज नाही वर्षा रडकुंडीला आली.
“ क्या हुआ मेरी जान" म्हणत एक महागडी कार तिच्याजवळ येऊन थांबली. गाडीतले पाचहीजण टल्ली होते. गुंडच.
“चलो, छोड़ देते हैं। हम भी आगेही जा रहे हैं...। अरे शर्माओं मत। चलो बैठ भी जाओ...। त्यातला एकजण पुढे होऊन तिच्या दंडाला पकडायचा प्रयत्न करू लागला. हे आपल्यावर अस्मानी संकट कोसळलय वर्षाच्या लक्षात आलं. ती प्रतिकार करू लागली. जोरजोराने ओरडू लागली... पण तिथे तिचा आवाज ऐकणारं कुणीही नव्हतं.
दोघे तिला पकडून जबरदस्तीने गाडीत बसवण्यासाठी पुढे आले तेवढ्यात...
ड्रूऽऽऽऽऽम...
समोरून रस्ता दुभाजक ओलांडून एक बुलेट त्यांच्यातल्या एकाच्या दोन ढेंगांमध्ये येऊन थांबली. तो जो कोण होता त्याची एंट्री लय भारी होती. समोरून दुभाजक ओलांडून शंभरच्या स्पीडने आललेला तो जेव्हा अचानक करकचून ब्रेक दाबून त्यांच्या समोर थांबला...त्याच्या बाईकचं मागचं चाक ४५ अंशापर्यंत हवेत उचललं गेलं, तिनशे साठ अंशात जमिनपातळीत गोल हवेत फिरत खाली उतरलं. त्या दोघांना खाली झोपवत... बाकी तिघे बघतच राहिले. एकाने कमरेचा कट्टा काढला.
बुलेटवाला एकदम शांत. तो कमरेत खाली वाकला, गुंडांना वाटलं हा हूल देतोय पण पॅंटीच्या कुठल्यातरी खिशातून काढलेली एक सिगारेट त्याच्या हातात होती. कळ्ळंलच नाही...
“ऐसे खिलौने हमने बहोत देखें है। ये तुम्हारे हाथ में शोभा नहीं देते।"बुलेटवाला म्हणाला.
“कौन हो तुम?" गुंडांपैकी एकाने चौकशी केली.
हातातली सिगारेट त्याने टिचकीने वर उडवली आणि उत्तर दिले “लक्ष्मीकांत...
नाम तो सुना ही होगा। आज कामभी देख लो।"
मघाशी जे दोघे खाली पडले होते त्यांनी पाठीमागून येऊन लक्ष्मीकांतला घट्ट पकडले. त्यांच्यातल्या म्होरक्याने लक्ष्मीकांतच्या पोटात आणि तोंडावर फाईट मारायला सुरुवात केली... ढिश्शूम...ढिश्शूम...ढिश्शूम.. वातावरण तंग. लक्ष्मीकांतने पूर्ण ताकद लावून डाव्या आणि उजव्या हाताला पकडलेल्या गुंडांना इतक्या जोरात समोरच्या बाजूला खेचलं की दोघेही एकमेकांवर डोकं आपटून पुन्हा खाली पडले. क्षणाचाही विलंब न लावता लक्ष्मीकांत त्यांच्या गाडीवर चढला आणि जी झेप त्याने त्या तिघांवर घेतली तिघेही आडवे झाले. त्यातला एक कसाबसा उठला ज्याच्या हातात बंदूक होती त्याने लक्ष्मीकांतवर बंदूकीतून छातीवर गोळी झाडली... ‘टण्'...
आवाज आला.
लक्ष्मीकांत म्हणाला “जाखो राखें साईंया मार सके ना कोय. ये हमारे पुरखों के तलवार को पिघलाकर बनाया हुआ लॉकेट है।" लक्ष्मीकात चवताळला; त्याने एकेकाला उचलले आणि त्या अंधारात फेकून दिले. ते तिघेही तिनशे मीटरवर पडले असावेत कारण त्यांचा व्हिवळण्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. खाली पडलेले दोघे अजूनही शुध्दीवर आले नव्हते.
मघाशी टिचकी मारून वर उडवलेली सिगारेट पन्नासऐक मीटरवर आली तशी लक्ष्मीकांतने कुठुनतरी एक बंदूक काढली. कळ्ळलंच नाही... ढींचक्यॉंव...एक गोळी त्याने हवेत झाडली. जळती सिगारेट त्याच्या ओठांमध्ये येऊन फिट्ट बसली. एक झुरका घेतला, सिगारेट संपली. धूर सोडला. थोडा वेळ कुट्ट अंधार झाला. चंद्रावरचा ढग बाजूला झाला. लक्ष्मीकांतने मागे वळून पाहिले, चंद्रप्रकाशात वर्षाचा चेहरा अधिकच खुलला होता. ती जबरदस्त इंप्रेस झाली होती. लक्ष्मीकांत कुणाला भाव देत नव्हता पण वर्षाने घात केला. लक्ष्मीकांत लव अॅट फर्स्ट साईट फ्लॅट झाला.
“चला बसा! सोडतो तुम्हाला घरी" लक्ष्मीकांतने बुलेटवर टांग टाकली. माणूस बरा वाटला,
वर्षाकडे दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध नव्हता.
“अय्या तुम्ही मराठी आहात! मला वाटलं साऊथ इंडियन आहात की काय!" वर्षा बसायला आणि कोसळायला एकच गाठ. दोघेही ओलेचिंब त्यात गार वारा सुटला होता. त्याच्या पाठीचा तिच्या उजव्या दंडाला होणारा उबदार स्पर्श दोघांनाही सुखावत होता.
वर्षाच्या कॉलनीत तिच्या बिल्डिंगजवळ बुलेट थांबली. वर्षाने लक्ष्मीकांतला घरी यायची विनंती केली पण उशीर खूप झाला होता म्हणून लक्ष्मीकांतने निघतो म्हटल्यावर वर्षा म्हणाली,“ कसे आभार मानू मी तुमचे, पिक्चरमधल्या हिरोसारखे अगदी योग्य वेळी आलात, आज तुम्ही होता म्हणून मी सुखरूप घरी पोचले...आणि हो एक सांगायचंच राहिलं.. मी हॉस्पिटलला ज्या दिवशी स्कूटी घेऊन जात नाही त्या दिवशी त्या समोरच्या बसस्टॉपवर सकाळी नऊची बस पकडते." लाजतच वर्षा घरी पळाली. पाठी उरला होता बुलेटचा आवाज, डुब.. डुब..डुब..डुब..
रात्री दोघेही झोपली नाहीत. एकमेकांची झोप जी चोरली होती. लक्ष्मीकांत सकाळी साडेआठ वाजताच बसस्टॉपवर हजर होता. पुढचा अर्धा तास तपासारखा होता. नजर तिच्या वाटेवर. ती तिच्या बिल्डिंगच्या गेटबाहेर रस्त्यावर आली... लक्ष्मीकांतच्या हृदयाची धडधड वाढली... आता ती रस्ता ओलांडून स्लो मोशनमध्ये बसस्टॉपवर येतेय...
ला..ला..ला.... ला..ला...
ला..ला..ला.... ला..ला...
ला..ला..ला.... ला..ला...
ला..ला..ला..ला..
ट्रीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ................
रात्री कान पिरगळलेल्या घड्याळाच्या चावीने पहाटे लक्ष्मीकांतवर सूड उगवला होता. डोळे चोळतच त्याने गजर बंद केला तरी त्याच्या कानात अजूनही बुलेटचा आवाज घुमत होता.....डुब....डुब....डुब....डुब...डुब
© विजय सावंत
२७/०४/२०२०
फोटो- विजय सावंत

छान आहे स्टोरी
ReplyDelete