कविता- बुद्धासारखं प्रेम कर! !
बुद्धासारखं प्रेम कर!
कसं स्तब्ध थांबलंय ना जग!
जागच्या जागी...
वेळच नव्हता कुणाला कुणाचा विचार करण्यासाठी...
जो तो धावत होता...
का कशासाठी...?
पोटाची खळगी भरण्यासाठी...?
भौतिक सुखासाठी...?
की दुसरा धावतोय त्याच्या पुढे जाण्यासाठी...?
खूप मोठं व्हायचंय त्याला
गवसणी घालायचीय आकाशाला...
हरकत काहीच नाही...
खूप मोठा हो, आकाशाला भिड...!
पण मिळालाच आहे वेळ
तर बघ जरा मागे वळवून शिड...!
धर्म वाईट नव्हता कधीच कुठला...
तरी बदलणार्याला म्हणतात बाटला...
जात एकच होती मानवाची पण किती फाटे फोडले त्याने...
दुस्वास, तिरस्कार, चुकीचे सोपस्कार...
आतून खल बाहेरून नमस्कार...
अनगिनत खर्च केले त्याने
दुश्मनाचा सामना करण्यासाठी...
अणुबॉम्ब, एके४७, जहाजे, विमाने, रणगाडे, तोफा नि काय काय...
किती वाढवली सेना दुश्मनांशी लढायला
पण उशीर झाला दुश्मन कळायला...
कळलंच नाही दुश्मन कुठल्या खिंडीतून आला
ना तोफगोळे चालले ना बॉम्ब कामी आला...
म्हणूनच...
म्हणूनच जर मिळाली नवी संधी तुला मानवा!
तर एक कर...
माणसावर बुध्दासारखं प्रेम कर...!
माणसावर बुध्दासारखं प्रेम कर...!
सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
विजय सावंत
१४/०४/२०२०
विजय सावंत
१४/०४/२०२०



👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!🙏
ReplyDeleteMast
ReplyDelete