कविता- पक्षांची शाळा
पक्षांची शाळा
भरली होती झाडावर
एकदा पक्षांची शाळा
काव काव करत
आला कावळोबा काळा
केला मिळून सर्वांनी
एकच मोठा गलका
मिसळला कोकीळने त्यात
सूर आपला शेलका
पोपटाने केली
बरीच पोपटपंची
वैतागून सर्वांनी
दिली त्याला एक मिरची
चिमणीची तर केवढी
बाई चालली होती घाई
बसायला अजूनही
तिला मिळत नव्हती फांदी
खंड्या तांबट सुगरण
सारे एकोप्याने होते
इवलुशांना फळ्यावरचे
दिसत काही नव्हते
फुलवला मोराने त्यात
सुंदर आपला पिसारा
झाले पाहून थक्क सारे
तो अद्भूत रम्य नजारा
आली सुताराला मध्येच
घर कोरायची हुकी
टक टक टक फांदीवर
घाव किती टाकी
कुणाचं काय
तर कुणाचं काय
पारव्याचं शेंड्यावर
भलतंच काय
अशी ही पक्षांची
एकदा भरली होती शाळा
आरवून म्हणाले कोंबडोबा
गुरूजी आले शांतता पाळा
गरूड गुरुजी आले
घेऊन चोचीत मोठी छडी
मारली घाबरून सर्वांनी
छूss भुर्रकन उडून दडी
_विजय सावंत
११/०७/२०२१
सर्व फोटो- विजय सावंत
स्पॉटेड डव
तांबट
शिंजीर
#Indianbirds #pakshanchishala #poempakshanchishala #vijaysawant












खुप सुंदर शब्द रचना आणि छायाचित्रे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
DeleteKiti chan....sagale pics manmohak
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
DeleteChaan aahe viju👌👍
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteसुंदर फोटो, कविताही छान !👌🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteखूपच छान विजय कविता आणि छायाचित्रे दोन्ही मस्त धन्यवाद🙏🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteफारच छान!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete