आणि बरंच काही- आठवणीतला पाऊस
आठवणीतला पाऊस
तो कुणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता
त्याने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या
दिवसही काळोखाच्या हवाली
त्याने करून टाकला होता
दुपारी बारा नंतर तो बरसायला लागला
छे! छे! छे! असा काही कोसळायला लागला
ज्यांचं नाव ते...!
त्याला काय झालं होतं कुणास ठाऊक...?
एवढं का भरून आलं होतं तेही त्यालाच ठाऊक
मीही त्याच्या सुरवातीच्या सरी अंगावर झेलल्या
अंगाला बोचणार्या टपोर्या टपोर्या
बाईकवर असताना त्याचं ते उग्र रूप तेव्हाच लक्षात आलं
तडतडणार्या सरीत तसंच घर गाठलं
पुढील चार तास...
फक्त धुमाकूळ...
चार-पाच वाजेपर्यंत तर सगळंच ठप्प झालं
वीज गेली... फोन बंद...
पाणी तुंबल्याने रस्ते बंद...
गाड्या ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत उभ्या...
ना पुढे ना मागे...
ट्रेन केव्हाच ठप्प झाल्या होत्या...
रस्त्यात अडकलेल्या मुली केविलवाण्या चेहर्याने
ऐर्यागैर्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत होत्या
घरी परतायच्या आशा आता सगळ्यांच्याच मावळल्या होत्या...
कुणाची ऑफिसमध्ये सोय झाली
कुणी गाडीत रात्र जागून काढली
कुणी स्टेशनवरच पथारी पसरली
ती काळरात्र संपण्याची मुंबई वाट पाहू लागली
तशातच मुंबईची माणुसकी पुन्हा धावून आली
जमेल तशी लोकांनी लोकांची सोय केली
चहूबाजूंनी चंदेरी नगरी इतकी जलमय झाली
आयुष्यात मी मुंबई अशी पहिल्यांदा थांबलेली पाहिली ...
मुंबईच ती...!
काही दिवसांत सावरली
त्या पावसात किती जणांची स्वप्ने मात्र वाहून गेली
२६ जुलै २००५...
आठवणीतला पाऊस
_विजय सावंत
२६/०७/२०२१
#26/07/2005mumbaiflood



Very Nice poem. Facts mentioned very nicely.
ReplyDeleteशब्दचित्रात्मक रचना.
ReplyDeleteकविता अनुभवली.
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete👌👌👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete