कविता- दरवर्षीच येतो पावसाळा
दरवर्षीच येतो पावसाळा
तोच गडगडाट ढगांचा
तोच कडकडाट लतेचा
आविष्कार आसमंतात विजेचा
वाजत येतो वाजत जातो
दरवर्षी तो असाच येतो
कधी भुरभुर कधी हलकी सर
कधी संततधार कधी मुसळधार
कधी स्वत:च मोकळा होतो
दरवर्षी तो असाच येतो
कधी तडतड ताशा कौलारू
वाहे पाटातून नाद गौलारू
बनात वेळूच्या मल्हार गातो
दरवर्षी तो असाच येतो
येतो तो असाच येतो
श्वास नवा देऊन जातो
असा कसा हा लडिवाळा
दरवर्षीच येतो पावसाळा
दरवर्षीच येतो पावसाळा
_विजय सावंत
१६/०७/२०२१
फोटो- विजय सावंत








वा वा सुखद गारवा
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteमनःपूर्वक धन्यवाद🙏
Deleteपाऊस म्हणजे आपल्याला सृष्टीचे वरदान आहे. पावसाच्या शिडकाव्याने सगळं मळभ दूर होतो मग तो आपल्या अवती-भोवतीमधला असो कि आपल्या मनातला... सुंदर रचनेची बरसात.. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!
Delete