आणि बरंच काही- मकर संक्रांत

 सृष्टीच्या उर्जेचा स्त्रोत... सूर्य! दक्षिणायन संपवून उत्तरायणात मकर राशीत प्रवेश करतो. आता शिशिरात वसंताची चाहूल लागते. पळस, काटेसावर याच दिवसात फुलतात. सृष्टीत रंगांची उधळण सुरू होते. सण हे माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. आपल्या माणसांना, समाजाला, निसर्गातील विविध घटकांना एकत्र बांधून ठेवायचं काम हे सण करतात. आज मकर संक्रांत! ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला' असं सांगणारा हा एक महत्त्वाचा सण. तीळ आणि गुळाचं पौष्टिकत्व अधोरेखित करणारा सण. माणसा माणसामधला स्नेहबंध वाढवणारा अगदी तिळा आणि गुळासारखा.

          संपूर्ण भारतात हा सण जरी वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जात असला तरी या सणाप्रती असलेली श्रद्धा एकच. अशा या नवीन वर्षातल्या पहिल्या सणाच्या,  मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!



Comments