कविता- चारोळी

 चारोळी

          १९९५ साली चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा' ने मला चारोळ्यांची मोहिनी घातली. तेव्हा ते चारोळ्यांचं छोटेखानी पुस्तक खूप प्रसिद्ध झाले होते, मला खूप आवडले होते. शैक्षणिक सहलीवर असताना एका निवांत क्षणी त्या चारोळ्या मी मित्रांसमोर सादर केल्या होत्या. त्याचं असं झालं होतं, आमच्या सरांनी रेल्वेची संदेश देवाणघेवाण यंत्रणा कशी चालते हे अभ्यासण्याठी आमच्यासाठी भुसावळ जळगावची ती अभ्यास सहल आयोजित केली होती. भुसावळला उतरल्यावर जवळच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात आमची राहण्याची सोय होणार होती पण काही कारणाने ती न झाल्याने सर दुसरी काही सोय होते का ते बघायला गेले होते. आम्ही भुसावळ स्टेशनच्या बाहेर एका मोडक्या तोडक्या घराखाली बसून होतो. तास दीड तास झाला तरी सरांचा पत्ता नव्हता, आम्ही सगळेच कंटाळलो होतो. तेवढ्यात मला कसं काय सुचलं कुणास ठाऊक मी माझ्या बॅगेतलं ‘मी माझा' काढलं. त्यानंतर पुढचा तास कसा गेला आमचं आम्हालाच कळलं नाही. आम्ही सगळेच त्या चारोळ्यांमध्ये गुंग होऊन गेलो होतो. सगळ्यांनाच आवडलं होतं ते सादरीकरण. त्यावेळी पुढे आयुष्यात मी कधी काही लिहेन असं अजिबात वाटले नव्हते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून लिहायला सुरुवात केली. त्यात चारोळ्यांचा वाटा मोठा आहे. चंद्रशेखर गोखले यांच्या ‘मी माझा'पासून ‘चारोळी' मराठी मनात घर करून बसली.

        चारोळी जरी चार ओळींची असली तरी तिच्यातला आशय खूप मोठा असतो. कधी कधी एखादा मोठा लेख लिहून किंवा मोठी लांबलचक कविता लिहून जे साध्य होणार नाही ते साध्य करण्याची ताकद चारोळीत आहे.


           संपूर्ण सृष्टीच्या उर्जेचा स्त्रोत तो म्हणजे सूर्य. त्याच्याशिवाय सृष्टीच्या अस्तित्वाची कल्पनाच करता येत नाही. म्हणूनच म्हटलंय...



         आधी विचार केला होता प्रत्येक चारोळी आधी दोन ओळी लिहाव्यात पण नंतर म्हटलं चारोळीलाच काय ते बोलू दे!

         माझ्या काही चारोळ्या आज मी आपल्या समोर सादर करतो आहे. कशा वाटल्या, आवडल्या की नाही ते आवर्जून कळवा.
































धन्यवाद!🙏


विजय सावंत.

०३/०१/२०२०

Comments

Post a Comment