कविता- वार्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य

वार्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य

उपयोगाऐवजी विज्ञान त्याने
 उपभोगासाठी वापरलं
अन् मग नादवलेल्या मानवानं
आयुष्य आपलं सारं पणाला लावलं

ना बदलला वेग धरेचा
ना ही ह्या ब्रम्हांडाचा
त्याने मात्र पकडलाय आता
वेग सुसाटलेल्या वार्याचा

सहज सोपं आयुष्य होतं,
बालपणात मशगूल होतं
होतं आता इथे होतं
सेलफोनवरच्या स्क्रीनवर रितं

तरूणपणाचे दिवस मजेचे
हौसमौजेचे फुलण्याचे
गेले ते दिवस गेले
माडांच्या बनात फिरण्याचे

संध्याकाळचे दिवस चार ते
रंगात मैत्रीच्या रंगायचे
रोगांपुढे गुडघे टेकले
आता गोळ्या खाऊन ढकलायचे

कोंडीत सापडलाय वेळ तुझा
अन् तुला मिळालाय एकांत खरा
मिळालाच आहे वेळ मानवा
तर मागे वळून बघ जरा...

अरे दाखव जरासं तू धारिष्ट्य
अन् सांभाळ तुझं...
वार्याच्या वेगाने बदलणारं आयुष्य

© विजय सावंत
०९/०६/२०२०

Comments

  1. वार्याच्या वेगाने चाललेले आयुष्याला
    आला आहे थोडासा अडथळा
    असाच रंग फुलू दे
    तुझ्या कवितांच्या प्रतिनभेला.

    पुन्हा कविता, लेख तुझ्या मिळू लागल्या
    देत नवीन जुन्या आठवणींचा उजाला

    सलाम विजू नेहमीप्रमाणे अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment