कविता - पोलिसांचं आयुष्य

पोलिसांचं आयुष्य

सदरक्षणाय खलनिग्रहणाय
आयुष्याची ज्योत पेटली
तन मन भावे देश रक्षता
संसारातली गुरफट सुटली

घोर घनघोर लावी जीवा
सदा तिला अन् मुलाबाळा
येशील कधी कसा घरा
वाटेवर तुझ्या असे डोळा

सोयही तुझी तुटपुंजी
रक्षिसी तू लाख जीवा
रक्त रक्त आटवूनसुध्दा
ना मिळते कधी दवादुवा

करतात ही वर्दी काळी
सडलेली ती जातकुळी
नको घेऊस लावून डाग
आहे वर्दी तुझी शुभ्र आग

जीव तुझा मोलाचा आहे
जपून राहा तू कर्तव्य आहे
ना व्यथा ना कथा आहे
ही तुझी शौर्यगाथा आहे

आम्हालाही मन आहे
कळतं तुलाही मन आहे
काटेरी हा रुबाब आहे
हे तुझे आयुष्य आहे

सलाम तुझ्या कार्याला
सलाम तुझ्या त्यागाला
सलाम तुझ्यातल्या पोलिसाला
सलाम पोलिसांच्या आयुष्याला
सलाम! सलाम! सलाम!

© विजय सावंत
१४/०६/२०२०

Comments