कविता- रूसवा तुझा
रूसवा तुझा
रूसवा तुझा फसवा कळतो मला
आव त्याचा कुंजरू छळतो मला
कुठून तू ही शिकलीस कला
खासच हे प्रिये जमते तुला
सोड ना तो आता अबोला
अबोलीचा गजरा आणला तुला
सांजही सजली आपुल्या कला
का दवडावी उगा प्रणयकला
बघ जरा डोळ्यात माझ्या तुला
दिसेल झुलता एक फुलझुला
दिसेल एक चाफेकळी भुलणारी
मी जिगीषु तू खुलणारी
रूसवा तुझा फसवा कळतो मला
आव त्याचा कुंजरू छळतो मला
कुठून तू ही शिकलीस कला
खासच हे प्रिये जमते तुला
सोड ना तो आता अबोला
अबोलीचा गजरा आणला तुला
सांजही सजली आपुल्या कला
का दवडावी उगा प्रणयकला
बघ जरा डोळ्यात माझ्या तुला
दिसेल झुलता एक फुलझुला
दिसेल एक चाफेकळी भुलणारी
मी जिगीषु तू खुलणारी
(कुंजरू - हत्ती, जिगीषु - जिंकणारा)
विजय सावंत
१६/०६/२०२०
विजय सावंत
१६/०६/२०२०


Comments
Post a Comment