कविता- उन्हाळ्याची सुट्टी

 उन्हाळ्याची सुट्टी 


पाटी पेन्सिल ठेवू बाजूला

जमवू खेळांशी बट्टी

चला चला रे मजेत घालवू

उन्हाळ्याची सुट्टी


गावी या म्हणुनी सांगती 

आजी आजोबा हट्टी

धमाल करू रानात फिरू

म्हणे छान जुळवू भट्टी


झुक झुक अगीनगाडी

वा साधीच आपुली एसटी

मिळेल त्याने चला गाठूया

गावाची रे वस्ती


आंबे फणस काजू चिंचा

रानमेव्याची मस्ती

दंड थोपटून चला खेळूया

खळ्यात आता कुस्ती


खुल्या अंगणी भल्या रंगतील 

रात्री भुतांच्या गोष्टी

भीती वाटता पळ काढुनी

कुशी आजीच्या शिरती


चला चला रे मजेत घालवू

उन्हाळ्याची सुट्टी


_विजय सावंत 

३१/०३/२०२५

















Comments