कविता- मतदान
मतदान
मला काय त्याचे
हा सोडून द्या हो ताठा
चला उठा आता
तुम्ही केंद्र जवळचं गाठा
पाच वर्षातून एकदाच
सोहळा इथे हा भरतो
मत तुमचं एक हक्काने
देश हा भारत मागतो
मोल एका मताचं
तू जाणून घे रे राजा
ठणाणा नको नंतर
नको बडवीत बसू बाजा
सदसद्विवेक बुद्धी अन्
अनुभवाची जोड काही
योग्य उमेदवार निवडता
होई प्रगल्भ लोकशाही
_विजय सावंत
20/05/2024
#election #poem #matadan #k3marathi #vijaysawant



Comments
Post a Comment