कविता- उन्हाळा
उन्हाळा
नवनवे रेकॉर्ड कसे
मोडतो आहे पारा
सळसळत नाही पानांतून
जराही वारा
काळजी घ्या स्वतःची
बघा जराशी सावली
कुणास ठाऊक कधी
पावेल वर्षामाऊली
यंदाचा उन्हाळा
त्याचा भलताच तोरा
भाजून निघालाय
आसमंत सारा
पाहा जरा आरशात
कशी छबी तुमची बावली
लाजू नका तुम्ही
घ्या छत्रीची सावली
असह्य झाल्या किती
घामाच्या धारा
हे देवा पाठव आता
पावसाच्या धारा
लाही लाही अंगाची
झाली आहे काहिली
कधी नाही अशी
ही गरमी यंदा पाहिली
टोपी रुमाल गाॅगल
सोबत पाण्याची बाटली
जवळ ठेवा आता
गरमी आहे वाढली
_विजय सावंत
उन्हाळा 2024



Comments
Post a Comment