कविता - आला पाऊस पाऊस
आला पाऊस पाऊस
आलं भरून आभाळ
गेलं सुखावून मन
ओलं ओलं झालं सारं
गेलं शहारून तन
कोसळल्या धारा अन्
झाली सुख पखरण
बरसला रिमझिम
झालं चिंब तनमन
मोहरली सृष्टी सारी
मोहरल्या दिशा दाही
थेंब नभाचे बिलोरे
पाने फुले झेलू पाही
तुझी जादुई दुलई
धरा अंगा ओढू पाही
शालू हिरवा नवा तो
दर्याखोरी विणू पाही
आला पाऊस पाऊस
चिंब ओलेते स्वरूप
न्हाऊ माझ्या मना घाली
आस तुझी रे अनुप
_विजय सावंत
२५/०६/२०२३



ओलं-ओलं, चिंब-चिंब अनं शहारून आलं मन, तृप्त धरा, प्रिये आर्जवे मंडुका
ReplyDeleteपाऊस आला कि कविही बहरतो, बरं !👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteAshe watte ki pausaat chimb chimb bhijun jave, great pausachi haluwar Santat dhar.pn man prassan zale ani garmichya ukadyatun turtaas tari sutka zalyachi Chahul lagli.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete