कविता - गावचो लळो
हल्ली उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गावी जाणं खूप सोपं झालंय. आज आहेत मुबलक खाजगी गाड्या, एस.टी., रेल्वे, कार... आणि आता तर विमानही. पण आधीची एक पिढी ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं' या दिव्यातून गेलेली आहे. पण त्या पिढीला गावचा लळा एवढा की हे दिव्य ते सहज पार करून जायचे. काही कारणास्तव आज जर त्या पिढीतील एखाद्याला गावी जाणं जमत नसेल, आणि त्यामुळे त्याला कोणी विचारत असेल, म्हणत असेल, ‘तुम्हाला गावचा लळाच नाही!'
त्या पिढीची अस्वस्थता, त्यांना गावाबद्दल असलेला लळा दर्शवणारी ही कविता खास मालवणीतून. कशी वाटली जरूर कळवा.
गावचो लळो
रात्र रात्र जागोन ज्येना
तिकीट यस्टीचा काढल्यान
शेवटाची शीट गावली तरी
कंबरेचो इचार नाय केल्यान
चाय पावडर मैसूरचो पुडो
आधीच बांधून ठेवल्यान
म्हातारेचो निरोप म्हनान
एक बॅटरी सुदाव घेतल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
डोक्यावरचा बोचक्या बांधार
चारदा काढून ठेवल्यान
स्टँड ता घर अंतर ज्येना
चालत चालतच गाठल्यान
उंबर्यावर म्हातारेक जेवा
उभी त्येना बघितल्यान
डोक्यावरचा बोचक्या आधी
खळ्यात टाकून दिल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
आंब्याची बिटकी अशी
नेम धरून पाडल्यान
आड्यातली जांभळा काढून
खाली उतरून वाटल्यान
चाराबोरा करवंदेच्या
जाळयेत हात घातल्यान
नदीवयल्या कोंडीत
पोरांक डुबकी मारून आणल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
मिरगाआधी घराचे नळे
परतून बदलून घेतल्यान
इरीतलो पतेरो सगळो
गाळ काढून टाकल्यान
सोमवारच्या बाजारातली
दोडया सुकटा सुकवून ठेवल्यान
म्हातारेक काय व्हयानको ता
सगळा सगळा भरून ठेवल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
चार चार दिवस सगळ्या
नात्याक ज्येना वाटल्यान
वडेसागोती, घावण्यांचो
बेत तडीस नेल्यान
वैशाख वणव्याक बघा कसा
पानी ज्येना पाजल्यान
मायेचो ओलावो
भरून काठोकाठ घेतल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
घराघरात वाडीतल्या जावन
चौकशी ज्येना केल्यान
म्हातारीच्या उशाक पुडो
पारले बिस्कुटाचो ठेवल्यान
गावातल्या देवळांक सगळ्या
गाठीभेटी दिल्यान
नाळ आसा आजव जुळलेली
नारळ ज्येना दिल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
आडयेतले आंबे
नीट बघून भरून घेतल्यान
फणसाक सुंभान धरोक
गावात असा केल्यान
खाजा खडखड्याक
नारळाच्या कापावांगडा भरल्यान
कुळदाचा पीठ
गावचो मेवो म्हनान घेतल्यान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
तो दिस उजाडता
निघोक व्हया नोकरी आसा म्हनान
म्हातारेचो मुको घेता
वायच खाली जरा वाकान
चतुर्थीक येतलंय
ठेवता आधीच तिका सांगान
निघताना जड होतत पावला
बघता चारदा मागे वळान
काय इचारतास त्येका
गावचो लळो काय असता म्हनान
वायच नजरेत बघा त्येच्या
इलो व्हाळ किती भरान
_विजय सावंत
०६/०६/२३



खूप छान कविता
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteव्वा !
ReplyDeleteचाकरमान्याचो गाव आन भावना भरून ओथंबलेली कविता.
विजयजी, असेच लिहिते रहा.
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखराच नजरेचो व्हाळ भरोन वाहिलो.फोटु खय हत?लय मजा आली असता.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteशब्द जोडून समजायला मजा आली, खूप छान.
ReplyDeleteयेवो कोकण आपलोच असा, सार्थ आहे
क्या बात!👍🏻
Delete