कविता - गुढीपाडवा

 गुढीपाडवा 

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. आजपासून सुरू होतंय मराठी नववर्ष, श्री शालिवाहन शके १९४५. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻


ऊंच ऊंच आकाशी काठी

केली त्यावर उपडी लोटी

कडूनिंबाची महिमा न्यारी

बताशाची सुमधुर गोडी


शुभ्र चाफ्याची माळ कशी

खणासंगे नटली थटली

मंद मंद समईच्या ज्योती

पाटाभवती रांगोळी सजली


उभी पाहा ती दारोदारी

मराठमोळी गगननभरारी

मंगलमय तोरण दारी

सौख्य नांदते घरोघरी


फुलली पहा सभोवती

चैत्रपालवी पिवळी पोपटी

नवरंगात नटून गेली

ताजी ताजी सृष्टी गोमटी


नववर्ष हे या मातीचे

संस्कृती आमुची मराठमोळी

ताटात गोडधोड पुरणपोळी 

वेष पारंपरिक लुगडीचोळी


स्वागत करूया नववर्षाचे

मराठमोळ्या बावनकशी 

लाख लाख शुभेच्छा तुम्हा

गुढीपाडव्याच्या या दिवशी


_विजय सावंत

२२/०३/२०२३












Comments

  1. हिंदू नववर्षाचा प्रथम दिन, वसंत ॠतूचा प्रारंभ, श्रीरामाचा राज्याभिषेक दिन, पक्षांचे कुजन, झाडांचे पालवी प्रकटन, गुढीचे रोहण, नुतन कार्यारंभ दिन, संपूर्ण दिन शुभ मुहूर्त ! आणखी काय हवे बरं !
    विजय सावंत सर, तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या ब्लॉग ला, तुमच्या रसिक वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌷🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete

Post a Comment