आणि बरंच काही - जागतिक चिमणी दिवस
एक घास चिऊचा
‘एक घास काऊचा एक घास चिऊचा', काऊचं ठीक आहे पण जर त्या बोबल्या बोलाने विचारलं, चिऊ कुते आहे मम्मा?' तर ती माऊली काय उत्तर देणार...? चिमण्या, त्यांचा चिवचिवाट आपल्या रोजच्या जीवनातून कधी गायब झाला कळलंच नाही. जाग आली तेव्हा आम्ही ‘चिमणी दिवस' पाळू लागलो. चिमण्या का गायब झाल्या यावर बरंच संशोधन झालं, तापमानवाढ, मोबाईल टॉवर ही कारणंही त्यातून पुढे आली. पण मला वाटतं माणसाचं बदललेलं राहणीमान हे मुख्य कारण असावं. आजच्या धावत्या जगात चिऊशी जवळीक कोण साधणार...? पण काही म्हणा एक काळ होता; चिमणी हा घराचा, अंगणाचा अविभाज्य भाग होता. बाळाच्या ताटात तिचाही एक घास होता. आज आम्ही वार्याच्या वेगाने धावतोय, वेळ नाही आमच्याकडे पाहायला आम्ही काय काय गमावत पुढे जातोय...!
हरवली आहे चिमणी
माझ्या हो अंगणातली
गेली ती कुठे कळेना
शोधून द्या हो कुणीतरी
चिव चिव आता नाही
चिवचिवाटही नाही
आसुसले कान कसे ते
डोळेही वाट पाही
येईल का दिस पुन्हा तो
बसेल ती अशी उंबर्यावरी
एक घास छोता चिऊचा
भरवेल तिला माझी परी
रागावली का काही कळेना
भुर्रकन उडून गेली सारी
वाट चुकली असेल का हो
की येईल परत कधीतरी
_विजय सावंत
२०/०३/२०२३
जागतिक चिमणी दिवस
# Sparrow



Khup Sundar
ReplyDeleteधन्यवाद!🙏🏻
Deleteअशी मनापासुन साद घातली तर ती येईल चिवचिवाट करत.होप सो!
ReplyDeleteनक्कीच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
वळचणी राहिल्या नसल्याने चिमण्यांना सुरक्षित घरटी बांधता येत नाहीत. मातीची मैदाने आणि झाडे नसल्याने अन्न मिळवणे, बागडणे चिमण्यांना कठीण झाले आहे. कवितेद्वारे त्यांचे अस्तित्त्व शिल्लक ठेवल्याबद्दल धन्यवाद 🙏
ReplyDelete🙏🏻
Deleteमुंबईत काही चिमण्या परत आल्या आहेत विजय कधी कधी दिसतात टिळक नगर चेंबूर मध्ये
ReplyDeleteलेख नेहमीप्रमाणेच खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद!
Deleteहो रे! आहेत, पण त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. पहिल्या जशा संख्येने एकत्र दिसायच्या, त्यांचा चिवचिवाट चालायचा तसं दृश्य आता नाही दिसत. ं