आणि बरंच काही - महिला दिन
आणि बरंच काही...!
महिला दिन
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वव्यापी स्त्रीचं माहात्म्य एका दिवसात नाही गाता येणार.., तिच्याशिवाय पुरुषाचं अस्तित्वच ते काय...?
आई, बहिण, बायको, मुलगी, मैत्रीण अशा सर्वव्यापी असणार्या स्त्रीला जेव्हा समाजात दुय्यम स्थान दिले जाते, तिच्यावर अन्याय केला होतो, तिच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येतो, तेव्हा प्रश्न पडतो.
नाही तुजविण दुजं
कुणी जगी या दांडगं
अजुनी का भिजत
तुझ्या अस्तित्वाचं घोंगडं?
शहरातली स्त्री आज मोकळी झाली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, आकाशाला गवसणी घालताना दिसत आहे, तिचं अस्तित्व उठून दिसतं. काळ बदललाय. पण...! पण ग्रामीण भागातील स्त्री काही प्रमाणात अजूनही त्या पुरुषी मानसिकतेच्या बेडीत अडकलेली आहे. या महिला दिनाचं औचित्य साधून का होईना तिला त्यातून बाहेर येण्यासाठी थोडंतरी बळ मिळतं. काहीएक संदेश, पुरुषी मानसिकतेत अडकलेल्यांपर्यंत पोचतो. आज हा महिला दिन खास तिचा. पण म्हणून तिने या एका दिवसाला न भुलता आयुष्य मोकळेपणाने जगायला सुरुवात केल्यास, आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड न घालता त्यासाठी पाठपुरावा केल्यास, आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढायला सुरवात केल्यास खर्या अर्थाने महिला दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.
बोरूची माझ्या बिशाद काय
गाण्या तुझी महती गं माय!
रणरागिणी, झुंजार, तळपती समशेर तू
धगधगती मशाल जा भेदूनी तम खुशाल तू
कोमल लाघवी हळवी हळवार तू
शारदेची आहेस शीतल चांदरात तू
कणखर जिद्दी उत्साही सळसळता प्रवाह तू
असीम त्यागाची आहेस परिसीमा तू
सरस्वती लक्ष्मी दुर्गा सन्मान तू
विठ्ठलाच्या मागे उभी रुक्मिणी तू
सोनेरी पहाटेचा दव प्राजक्ताचा सडा तू
आयुष्यभर दरवळत राहाणारा केवडा तू
खास दिवस तुझा सोनियाचा आहे आज गं!
लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून तुला खास गं!
_विजय सावंत
०८/०३/२०२३


विजय खूपच छान तू यमक समर्पक आणि मस्त असतात.
ReplyDelete😊😊
धन्यवाद मित्रा!🙏🏻
Deleteयर्थाथ वर्णन स्रिरुपाच!
ReplyDeleteधन्यवाद!🙏🏻
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमहिला महती गीत अगदी समर्पक !
ReplyDeleteमानवाच्या जन्मदात्रीस नमन 🌷🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete