आणि बरंच काही - आली दिवाळी

 नमस्कार मंडळी!🙏🏻

आली , ती पुन्हा आली. दिवाळी...तुम्हाआम्हा सर्वांची लाडकी दिवाळी. खरंच हा सण जरा वेगळाच, या सणाचे वेध दसर्यापासूनच लागतात. आणि या सणाची नशा डब्यातील फराळ संपेपर्यंत तरी कायम असते. हा आनंदाचा, उत्साहाचा, स्नेहाचा सण. सणांचा राजा म्हटलं तरी वावगं ठरू नये. घरची परिस्थिती कशीही असो, गरीब श्रीमंत आपापल्या परीने हा सण साजरा करतो. लहान असो वा म्हातारे, सारेच दिवाळी मनोभावे साजरी करतात. 

          श्रीरामांचं लंकेवर विजय मिळवून दिवाळीच्या दिवशी अयोध्येत पोहोचणं, वातावरणातील बदलाला सामोरं जाण्यासाठी याच काळात केलेलं फराळाचं प्रयोजन, नवीन पीक कापणी झाल्यानंतर हातात आलेला नगदी पैसा... त्यातून होणारी खरेदी. सगळंच कसं अगदी उत्साही, आनंदी. हा ओतप्रोत भरलेला आनंद घेऊन येणार्या दिवाळीचं चला स्वागत करूया!

           

स्पर्श रेशमी घेऊनी आली

आली आली, आली दिवाळी

काढुनी सुंदर रांगोळी दारी

स्वागत करूया आली दिवाळी


आकाशकंदील झुलते दारी

नवचैतन्याची ऐका हाळी

रंगबिरंगी तोरण लावुनी

स्वागत करूया आली दिवाळी


तेज फाकले तम सरले

दिशांत दाही मोद हिवाळी

करू जय्यत चला तयारी

स्वागत करूया आली दिवाळी


सुखसमृद्धी आरोग्य आणि

आकांक्षांची भरून झोळी

लाभो सर्वा निर्मळ शांती

स्वागत करूया आली दिवाळी


नेसुनी वस्त्रे मराठमोळी

करू  साजरी थाटात दिवाळी

घडो आप्तस्वकीयांच्या भेटी

स्वागत करूया आली दिवाळी


एक दिवा खास त्यांच्यासाठी

बलिदान हो ज्यांच्या भाळी 

लक्ष लक्ष उजळीत ज्योती

स्वागत करूया आली दिवाळी


सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेछा!🙏🏻

_विजय सावंत 

२३/१०/२०२२



Comments

  1. आली दिवाळी

    ReplyDelete
  2. https://youtu.be/j-oh8QwldjY

    ReplyDelete
  3. खूपच छान पुन्हा दिवाळी विषयक तुझा छानसा लेख वाचायला मिळाला

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment