आणि बरंच काही - दसरा

 नमस्कार मंडळी!🙏🏻

खूप दिवस झाले, काही पोस्ट नाही...! कामात व्यग्र झाल्यामुळे लिखाणाकडे लक्ष देता आले नाही. लवकरच काही वाचनीय पोस्ट मी घेऊन येणार आहे. तुम्हाला त्या नक्कीच आवडतील. सांगायला आनंद वाटतो की मी जरी नवीन पोस्ट पाठविली नाही तरी या आपल्या ब्लॉगला रोज भेट देणारे वाचक वाढत आहेत. हे तुम्ही केलेल्या शेअरमुळे शक्य झाले आहे. पुढेही अशीच आवडलेली पोस्ट शेअर करा, कॉमेंट करा, काही सूचना असल्यास त्याही कळवा.

आज दसरा. सृष्टीतील नवचैतन्याचा सोहळा. नात्यानात्यातील बंध दृढ करण्याचा हा सोहळा आगळा. आयुष्यात आलेली सोन्यासारखी माणसं जपून ठेवणं हीच खरी पूंजी. तुम्हा सर्वांना या सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 

_विजय सावंत

०५/१०/२०२२



Comments