कविता- पाऊस आला
पाऊस आला
अजि शमला ग्रीष्म वणवा
स्पर्श सुखद अंगाला झाला
रूप शामल घेउनी आला
आला पहिला पाऊस आला
रानवारा सोबतीला धारा
पायवाटा ओल्या झाल्या
शहारलं शिवार कोरडं
आ वासून भेगा पाणी प्याल्या
उडवीत चिखल पायाने
बोली बोबड्या पाऊस नारा
चिलीपिली धावत सुटली
उघड्या अंगा झेलीत धारा
लगबग ती सुरू जाहली
त्रेधातिरपीट हो उडाली
बळीराजा हाकीत निघाला
वृषभाची जोडी खिल्लारी
चला करू या स्वागत आला
नव सृजन सोहळा आला
मनास चिंब न्हाऊ घालू या
आला पुन्हा पावसाळा आला
_विजय सावंत
१२/०६/२०२२
#VijaySawant #Kathakavitakavadasa #k3marathi.blogspot.com







खूपच छान जसाचा तसा
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखुप छान, सुंदर आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखुपच छान आहे, सुंदर आहे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete👌🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखूपच छान कविता जणू काही मनात इच्छा निर्माण जाहली पावसात ओलेचिंब भिजण्याची
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteपावसाच सुख !!!
ReplyDeleteहो! एक वेगळंच सुख!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
अजुन फोटो हवे होते ही रिमझिम होती.कविता मस्त.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद! 🙏🏻
Deleteछान ओळी विजय, मस्त गारवा जाणवला
ReplyDelete👍👍
मनःपूर्वक धन्यवाद मित्रा!👍🏻
Delete