कविता- पाऊस आला

 पाऊस आला

अजि शमला ग्रीष्म वणवा

स्पर्श सुखद अंगाला झाला

रूप शामल घेउनी आला

आला पहिला पाऊस आला


रानवारा सोबतीला धारा

पायवाटा ओल्या झाल्या

शहारलं शिवार कोरडं

आ वासून भेगा पाणी प्याल्या


उडवीत चिखल पायाने

बोली बोबड्या पाऊस नारा

चिलीपिली धावत सुटली

उघड्या अंगा झेलीत धारा


लगबग ती सुरू जाहली

त्रेधातिरपीट हो उडाली

बळीराजा हाकीत निघाला

वृषभाची जोडी खिल्लारी


चला करू या स्वागत आला

नव सृजन सोहळा आला

मनास चिंब न्हाऊ घालू या

आला पुन्हा पावसाळा आला

_विजय सावंत

१२/०६/२०२२





      



#VijaySawant #Kathakavitakavadasa #k3marathi.blogspot.com


Comments

  1. खूपच छान जसाचा तसा

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  2. खुप छान, सुंदर आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  3. संदिप मुळेJune 12, 2022 at 12:34 PM

    खुपच छान आहे, सुंदर आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  4. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  5. खूपच छान कविता जणू काही मनात इच्छा निर्माण जाहली पावसात ओलेचिंब भिजण्याची

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  6. पावसाच सुख !!!

    ReplyDelete
    Replies
    1. हो! एक वेगळंच सुख!
      मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  7. अजुन फोटो हवे होते ही रिमझिम होती.कविता मस्त.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🏻

      Delete
  8. छान ओळी विजय, मस्त गारवा जाणवला
    👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद मित्रा!👍🏻

      Delete

Post a Comment