कविता- श्रीराम
जन्मले श्री श्रीराम अयोध्येत
घेऊनी चमचा सोन्याचा मुखात
पुरविले लाड सर्व थाटात
चंद्रही सजला कौसल्येच्या बाळात
सुटतील कसे दशरथ त्यातून
भोगावे भोग कर्माचे असतात
होण्या राजा पुत्र कैकयी भरत
धाडीले रामा त्यांनी वनवासात
मानूनी ती आज्ञा शिरसावंद्य
घेतला निरोप हासत हासत
मैया सीता अन् लक्ष्मण
निघाले श्रीराम त्यांच्यासोबत
होता समय कठीण वनात
झाले सीताहरण तेवढ्यात
मोहमयी मृग जयात
घडले रामायण त्या काळात
होते गुण दुर्गुण रावणात
पडला अहंकार महागात
गेले मिसळून सारे मातीत
गर्वहरण सीतामाईच्या रूपात
होता चौदा वर्षे हा वनवास
घडले रामायण त्या काळात
सत्य मर्यादापुरुषोत्तम रामात
मिळविला विजय त्यांनी लंकेत
चालता षडरिपूंचे द्वंद्व मनात
आहे उत्तर त्यासी रामायणात
मिळतो एकदाच हा जन्म
शोधावा राम आयुष्यात
सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
© विजय सावंत
फोटो- विजय सावंत
२१/०४/२०२१
रामटेक येथील यादवकालीन श्रीराम मंदिर
<script data-ad-client="ca-pub-2420490495890015" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>google.com, pub-2420490495890015, DIRECT, f08c47fec0942fa0






👌👌
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Delete🙏👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!🙏
Delete