कविता- विश्वरत्न
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हे शिकविणारी ही व्यक्ती. भारत सरकारने त्यांचा ‘भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यांच्या कर्तृत्वाची उत्तुंग भरारी पाहता ते विश्वरत्न आहेत. त्यांच्या विचारांना अनुसरून चालणारे अनुयायी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. भारतभूच्या क्षितिजावर उगवलेले अन् कधीही न मावळणारे ते एक सूर्य आहेत. पुढील कित्येक शतकं त्यांच्या प्रकाशमान विचारांनी उजळत राहतील यात शंका नाही. भारतमातेच्या या महान सुपुत्राला विनम्र अभिवादन!🙏
#Dr.babasahebambedkar #kathakavitakavadasa #vijaysawant



🙏🙏
ReplyDelete🙏
ReplyDeleteबाबासाहेबांच्या अफाट कर्तृत्वाला साष्टांग दंडवत.
ReplyDeleteखूप छान विजय 🙏🙏
Shailesh