आणि बरंच काही- गुढीपाडवा
नमस्कार!🙏
गेल्या गुढीपाडव्याला हा ब्लॉग सुरु केला होता, त्यात नियमितपणे मी कथा, कविता, कवडसा आणि इतर बरंच काही देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया ब्लॉगवर तसेच वैयक्तिक WA चॅटवर सतत येत आहेत. काही मित्र मार्गदर्शनही करतात. या ब्लॉगची लिंक मी मर्यादित मित्रमंडळींना पाठवत आहे. तरीही वर्षभरात पाच हजारांहून अधिक वाचकांनी भारतातूनच नव्हे तर अमेरिका, ओमान, अॉस्ट्रेलिया, UAE, पोर्तुगाल, सिंगापूर, इंडोनेशिया, या देशांतूनही ब्लॉगला भेट दिली. तुम्ही सर्वांनी ब्लॉगला दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो! 🙏
गुढीपाडवा
आज चैत्र शु. प्रतिपदा, गुढीपाडवा. मराठी नववर्षाची सुरुवात. आमचे सगळेच सण कसे निसर्गाशी निगडीत, वसंतऋतूचं आगमन सृष्टीत रंगाची उधळण करतच होतं; पळस, सावर, पांगारा, बहावा छान बहरलेले असतात, वृक्षांना नवी पालवी फुटलेली असते. सगळीकडे वातावरणही कसे आनंदमय झालेले असते. हा पावसाळ्यात पेरणी करण्यापूर्वी वर्षभराचं नियोजन करायचा समय. एक नवी सुरुवात.
आज सगळं जग एक झालं आहे. तरीही प्रत्येक देशाची, खंडाची संस्कृती वेगळी. जगाबरोबर चालायचं तर कुठलंतरी एक प्रमाण मानावे लागणार, संपूर्ण जगाने नववर्षाची सुरुवात म्हणून एक जानेवारी मान्य केलं आहे. पण आजही जगातील काही जुन्या संस्कृती आपल्या संस्कृतीप्रमाणे नववर्ष वेगवेगळ्या दिवशी, तिथीला साजरं करतात. गुढीपाडवा. आमचं नववर्ष.
महाराष्ट्राच्या भूमीवर कितीतरी राजघराण्यांनी राज्य केलं. पण महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासाचा धांडोळा घ्यायचा झाल्यास तो सातवाहनांपासून सुरू करावा लागतो. महाराष्ट्राची भूमी सुजलाम सुफलाम, अशा भूमीवर ताबा मिळविण्यासाठी परदेशी आक्रमकांची अहमिका असायची. शकांबरोबर लढून सातवाहनांनी महाराष्ट्राच्या भूमीवर आपले राज्य प्रस्थापित केले. प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण त्यांची राजधानी. सातवाहनांचा काळ हा महाराष्ट्रातला वैभवशाली, समृद्ध, कलाश्रयाचा काळ गणला जातो. सातवाहन राजा शालिवाहन याने शालिवाहन शक ही कालगणना सुरू केली. शालिवाहन शक आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचा फरक आहे. म्हणजे शालिवाहन शक + ७८= इसवी सन.
शक संवत्सराचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. तोच आपला पहिला वर्षदिन, चैत्र शुध्द प्रतिपदा. आपण गुढी उभारून दरवर्षी हा दिवस साजरा करतो. गुढी हे समृद्धीचं, विजयाचं प्रतिक आहे. याच दिवशी रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला पोहचले तेव्हा नगरवासीयांनी त्यांचं स्वागत दारादारात उंच गुढ्या उभारून केलं. उंच काठीच्या टोकाला कडूलिंब, चाफ्याच्या फुलांची माळ, बत्ताशाची माळ, आंब्याचा टाळा, आणि रेशमी वस्त्र गुंडाळलं जातं, त्यावर तांब्या अथवा इतर धातूचा लोटा उलटा ठेवला जातो. अशी ही गुढी घराच्या दाराशी पाटावर उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. गुढीची विधीवत पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. दारोदारी उभ्या केलेल्या या गुढ्या खरंच खूप सुंदर दिसतात. चैतन्य असतं त्यांच्यात. संध्याकाळी पुन्हा विधीवत पूजा करून गुढ्या उतरवल्या जातात. महाराष्ट्रात हा दिवस जेवणात गोडधोड पदार्थ करून आणि मित्र नातेवाईकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन साजरा केला जातो.
अशा या अस्सल मराठमोळ्या सणाच्या आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा! चला स्वागत करूया शके १९४३ चं!
गुढी
ऊंच ऊंच आकाशी काठी
केली त्यावर उलटी लोटी
कडूनिंबाची महिमा न्यारी
बताशाची सुमधुर गोडी
शुभ्र चाफ्याची माळ कशी
खणासंगे नटली थटली
मंद मंद समईच्या ज्योती
पाटाभवती रांगोळी सजली
उभी पाहा ती दारोदारी
मराठमोळी गगननभरारी
मंगलमय तोरण दारी
सौख्य नांदते घरोघरी
चैत्र शुद्ध प्रतिपदेला
चैत्रपालवी फुलवी सृष्टीला
आनंदाचे उधाण येते
मराठमोळ्या नववर्षाला
(यंदाच्या गुढीपाडव्यावर कोरोनाचं सावट जरी असलं तरी प्रत्येक मराठी घर हा सण तितक्याच उत्साहाने साजरा करणार यात शंका नाही. पण तरीही एक विनंती नक्कीच करेन की आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. मास्क वापरा. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जाऊ नका.)
धन्यवाद! 🙏
विजय सावंत
१३/०४/२०२१
<script data-ad-client="ca-pub-2420490495890015" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>google.com, pub-2420490495890015, DIRECT, f08c47fec0942fa0


असाच तुझा ब्लॉग वाढत जाओ....आणि आम्हाला सुंदर सुंदर फोटो.... कवीता.... लेख वाचायला मिळोत....
ReplyDeleteखुप खुप शुभेच्छा वीजु..........
धन्यवाद निलेश!🙏
DeleteCongrats......All the best .......waiting for more blogs poems beautiful pics......
ReplyDeleteSubhechha
धन्यवाद!
Deleteमस्त.. नेहीप्रमाणेच.. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteविजय सर,
ReplyDeleteतुमचा हा साहित्यिक ब्लाॅग प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णू व्हावा. ही इश्वरचरणी प्रार्थना !
आम्ही महाराष्ट्रीयन आपले चाहते आहोतच. परंतु हे लोण देश-विदेशात पोहोचले ह्यासाठी तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! 💐
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteसुंदर.....खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteवर्षपूर्ती आणि सातासमुद्रापार आपली साहित्य संपदा पोहोचविण्यात आपण यशस्वी झालात , त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा !!! 💐👌👍🚩
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteवा विजू खूपच मस्त मला हवी ती माहिती पण मिळाली जोडीला अधिकची माहिती पण मिळाली शिवाय तुझी अप्रतिम सुंदर कविता गुढीपाडवा सार्थकी लागला
ReplyDelete