कविता- आषाढी एकादशी २०२४
आषाढी एकादशी २०२४
उरी आतुरता मोठी
वाट माहेर पंढरी
भूक तान हरपून
दंग होती वारकरी
देव चंद्रभागेतिरी
कर त्याचे कटेवरी
पाही वाट तो भक्तांची
आहे उभा विटेवरी
किती पिढ्यांचा सोहळा
चैतन्याची ही प्रचिती
चंद्रभागेतिरी येई
जणू सागरा भरती
युगे अठ्ठावीस उभा
देव विठोबा सावळा
भक्तिरसात नाहातो
जोतो होई इथे गोळा
सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
आषाढी एकादशी २०२४
_विजय सावंत
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2420490495890015"
crossorigin="anonymous"></script>




Comments
Post a Comment