कविता- स्वागत तुझे करताना
नमस्कार मंडळी!🙏🏻
तुम्हा सर्वांना नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत तुझे करताना
आकांक्षांचे तेच नवे
वर्ष जुने सरताना
मागतो जे राहिले मागे
स्वागत तुझे करताना
नाही काही मागणे इतुके
गाडीबंगला चांदीसोने
दे मजशी दे पुन्हा
दिवस ते सोनेरी जुने
दे बळ आणखीन थोडे
पाठलाग करताना
सहजसोपे आयुष्य व्हावे
दिस दिस जगताना
मोजकेच दे, दे सोवळे
सोहळे इथे सजताना
चांदण्यात न्हाऊ दे मजला
आयुष्य हे सरताना
_विजय सावंत
01/01/2024
#newyearpoem



Comments
Post a Comment