दीपावली...!
एक दीप... आपल्या आजूबाजूचा अंधार दूर करतो. दीपावली.... दिव्यांची शृंखला किंवा माळ परिसर उजळून काढते. अमावस्येला येणारा हा सण... म्हणूनच दिव्याला महत्त्व. जणू सांगतोय...
एक दिवा उजळू दे
खोल हृदयात अंतरी
रंजल्यागांजल्या जीवांना
दिसू दे पंढरी
लखलख करी चंदेरी
दुनिया ही सारी
घराघरात त्यांच्याही
पसरू दे प्रकाश भवताली
नको आतषबाजी ती
विनाशकारी भयकारी
विश्वशांती लाभू दे
नांदू दे सुखात सारी
दीप दीप एक दीप
असे इवलासा जरी
मिटवी अंधार तो
जो दाटला अंतरी
चला समजून घेऊया
व्रत आगळे दीपावली
सुख समृद्धी आनंद हा
पसरो घरोघरी पावली
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
_विजय सावंत



Comments
Post a Comment