कविता - गौरी गणपती २०२३
गौरी गणपती २०२३
नमस्कार मंडळी! कसे आहात तुम्ही सगळे...? नक्कीच मजेत!
आज गणरायाचं आगमन...मोठा उत्साहाचा सण. या सणाविषयी जेवढं लिहावं तेवढं कमीच. त्याचा बाज, त्याचा साज, त्याचा आवाका... सारंच प्रशस्त. हरेक जण आपल्या परीनं बाप्पाचं स्वागत करतो, त्याची सेवा करतो. मुंबईत या सणाचं स्वरूप सार्वजनिक असलं तरी काही ठराविक घरी हा उत्सव तेवढ्याच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कोकणात हा उत्सव मात्र घराघरात साजरा केला जातो. गौरीगणपतीचा सण आणि कोकण यांचं एक अतूट नातं आहे. कोकणातील प्रत्येक वाडी गणेशोत्सव काळात फुलून येते. घरं भरतात, आप्त भेटतात. सारंच वातावरण या काळात भारलेलं असतं. त्याचं आगमन...त्याची सेवा... आरती...भजन...लाडू करंज्या... जागरण. 'काय रे कसो हस रे?' 'बाकी बेस ना...!' कानावर पडणारे हे शब्द. जे कोकणातील नसतील त्यांनी आयुष्यात कधीतरी एकदा कोकणातला गणेशोत्सव अनुभवावा. एक वेगळीच अनुभूती हाती लागेल.
सर्वांना गौरीगणपती सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
जल्लोष ढोल ताशाचा
उल्हास मनी हर्षाचा
करू स्वागत बाप्पाचे
सण हा मोठा वर्षाचा
रंगात रंगल्या भिंती
छता सजल्या पताका
तोरण सुंदर दारी
मंडपात देखावा
बाप्पा तुझ्या भेटीला
चाकरमानी आला
विघ्नहर्ता विनायका
पाव भोळ्या भक्ताला
वाहतो दुर्वा फूल तुला
हात जोडुनी वंदना
ठेव सुखी तू सर्वांना
हीच एक आराधना
मोद आगळा हा खरा
उत्सव मोठा साजिरा
कोकणात घराघरा
सण होई हा साजरा
_विजय सावंत
१९/०९/२०२३



गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
ReplyDelete🙏🏻
DeleteGanpati Bappa Mouraya ❤️
ReplyDelete🌺बाप्पा 🙏🏻🌺
ReplyDeleteगणपती बाप्पा मोरया
ReplyDeleteगंपत्ती बाप्पा मोSSSया !🙏👏
ReplyDelete