कविता - बाभळी
कविता - बाभळी
बोरी बाभळी, जणू एखाद्या गावात सामान्य रूप घेऊन जन्मलेल्या लेकीच. इतर सुंदर मुलींची वयात येताच पटापट लग्न होऊन त्या सासरी जातात. यांना अंमळ उशीरच होतो. पण म्हणून काही त्यांचं लग्न व्हायचं राहत नाही. त्यांचीही गाठ बांधलेली असतेच. आणि सुंदरता म्हणजे काय हो! लग्न झाल्यावर स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्याच बदलून जाते. ती संसारात रमते, सणांत सजते, बहरते, फुलते पुन्हा रुजते. बाभळीचंही तसंच. तिचंही एक विश्व असतं. त्यात ती रमते. बाभळीचे काटे हे खरं तर बाभळीसाठी वरदान असतात. पहाटेचे दवबिंदू ते शोषून घेतात. या तिच्या गुणामुळे ती कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहू शकते. कष्टच जिच्या पाचवीला पुजले आहेत, पण तरीही डगमगून न जाणारी, त्या काटेरी परिस्थितीत तग धरून राहाणारी... ती खंबीर. या काट्यांमुळेच सुगरण बाभळीच्या झाडाची निवड घरटं बांधण्यासाठी करते. त्या सामान्य रूप घेऊन जरी जन्माला आल्या असल्या तरी कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहाण्याचा गुण त्यांना जन्मजातच मिळालेला असतो वरदान म्हणून.
बाभळी
एकाच गावच्या लेकी
बोरी अन् बाभळी
नसे रूप रंग गंध
त्यातही सावळी
द्यावे तरी काय कुणा
आहे जराशी सावली
झुलती झुंबरे बरवी
श्रावणात पिवळी
काटेच असती जिच्या
आजन्म भाळी
विणते सुगरण तिथे
नक्षीदार जाळी
बाभळीच्या नशिबी
वाळवंट जरी
तग धरूनि आहे
आजही उभी
नसे जिथे पालवी
चिकू, पेरू, जांभळी
माळरानावर खुलवी
क्षितिज बाभळी
_विजय सावंत
२१/०५/२०२३



खूप छान मित्रा keep it उप
ReplyDeleteमस्त 👌👌👌
Deleteधन्यवाद!🙏🏻
Deleteसुंदर वर्णन ....आणी कवीता पण छानच...
ReplyDeleteअखेरीस... भर ऊन्हात माळरानावर पाय रोऊन ऊभी असलेली बाभळ डोळ्या समोर आली....आणी काळी सावळी पण घट्टूमघट ..ऊन्हात राबणारी स्त्री पण...
वाह...! छान कॉमेंट! मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteपाहून काव्य आपल्या भाळी
ReplyDeleteसखी बोरीसह मोहरली बाभळी !
👌🏻👌🏻👍🏻
DeleteKhup Chaan Kavita, keep it up
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखूप छान वाटले 👌
Deleteधन्यवाद!🙏🏻
Deleteबरेच दिवसानी बाभळी चा उल्लेख झाला आणि तिचे असणे आवश्यक आहे. खूप छान कविता आणि वर्णन विजय 🙏🙏👍
ReplyDeleteधन्यवाद मित्रा!👍🏻
Delete