आणि बरंच काही- नववर्ष शुभेच्छा!
नमस्कार मंडळी! 🙏
आपणा सर्वांना जागतिक नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपणांस सुखसमृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सदिच्छा.
आज या ठिकाणी सदिच्छा देताना आपले आभार मानायची संधीही चालून आली. तुम्ही वाचक म्हणून या ब्लॉगला जो प्रतिसाद दिला तो खूप महत्त्वाचा आणि आनंद देणारा आहे. मी माझे लिखाणाचे कार्य करतो. ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टाळी कधी एका हाताने वाजत नाही. ती वाजवायचे काम तुम्ही करता. त्याबद्दल तुम्हा सर्व वाचकांचे मी मनापासून आभार मानतो.
आपला हा ब्लॉग आता बाळसं धरू लागला आहे. देशविदेशात पसरू लागला आहे. नवनवीन देश यादीमध्ये जोडले जात आहेत. हे सर्व शक्य झालं आहे तुम्ही वाचकांनी आवडलेल्या पोस्ट पुढे पाठविल्यामुळे. अमेरिका, लंडन, ओमान, दुबई, सिंगापूर, मलेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना पाठोपाठ हा ब्लॉग आता गेल्या काही पोस्टपासून थेट नेदरलँड्स, रशिया, जर्मनी, स्वीडन, आयर्लंडला जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेतील वाचकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कौतुक करावेसे वाटते ते पोर्तुगालमधील एका वाचकाचे. माझी प्रत्येक पोस्ट त्यांनी आवर्जून वाचली आहे. या साऱ्या परदेशी राहाणार्या मराठी भाषिक वाचकांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो.
राहिले आभार मानायचे ते देशातील वाचकांचे, त्यात मित्र आहेत, नातेवाईक आहेत, शेजारी आहेत, परिचित तसेच अपरिचितही आहेत. त्या सर्वांचे आभार मानल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
म्हणूनच या नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना तुम्हा सर्व वाचकांचे मी आभारही मानतो आणि तुमचा हा लोभ मला सदा लाभत राहील अशी आशाही बाळगतो. धन्यवाद! 🙏
तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!🌸
_विजय सावंत
०१/०१/२०२२


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 💫
ReplyDeleteश्रीयुत विजय सावंत आणि ब्लॉग परिवारास नववर्ष २०२२ ऊत्तम आरोग्य आणि सर्व इच्छा पूर्तीचे जावो. 🎄🎆🎇✨🎉🎊🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
ReplyDelete