कविता- आली दिवाळी


आली दिवाळी

आली आली दिवाळी आली

सोनपाऊली दिवाळी आली

काढुनी रांगोळी सुंदर दारी

स्वागत करूया भल्या सकाळी


जुळता सुंदर रंगसंगती

आकाशकंदील शोभे दारी

रोषणाईने उजळुनी जाई

गल्ली गल्ली अन् नगरी सारी


रास धान्याची खळ्यात आली

माय लक्ष्मी घरात आली

वसुबारस धनतेरस झाली

आली आली दिवाळी आली


चकली करंजी शंकरपाळी

अनारशांची गोडी न्यारी

लाडू चिवडा कडबोळीही

शेवाची ती काय खुमारी


थंडी गुलाबी सोबत आली

सुखाची हो बरसात झाली

बंडी टोपी बाहेर काढुनी

करू तयारी ऋतूबदलाची


तेज पणतीचे उंबर्यावरती

दिवसरात्र तेवत राही

शहीद झाले जे आम्हासाठी

लावू दिवा एक तयांसाठी


लक्ष दिवे उजळीत आली

तिमिरातून तेजाकडे ही

घेउनी आरोग्य समृद्धी आली

उठा उठा हो दिवाळी आली


सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏

_विजय सावंत

०४/११/२०२१



Comments

Post a Comment