आणि बरंच काही- शिक्षक दिन

 शिक्षक दिन

          आज शिक्षक दिन, शिक्षकाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, त्यांनी समाजासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्याचा हा दिवस, आयुष्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा शिक्षकांनी दिलेल्या शिकवणुकीचा असतो. जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. भारतात हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. आज त्यांचा जन्मदिवस. ते शिक्षणतज्ञ तर होतेच पण भारताच्या शिक्षणक्षेत्रात झालेल्या भरीव कामगिरीत त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा मोलाचा वाटा आहे. 

          गुरुशिष्य हे नातं जरा वेगळंच असतं, आपल्या हाताखालून कितीतरी विद्यार्थी शिकून गेलेले असतात पण शिक्षकाला आपला प्रत्येक विद्यार्थी नेहमीच लक्षात राहतो. काही शाळांमध्ये हा दिवस विद्यार्थ्यांना शिक्षकांची वेशभूषा करायला आणि तास घ्यायला सांगून साजरा केला जातो. अशावेळी एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षकाची लकब इतकी हुबेहूब उतरवतो, सर्व वर्गात धमाल उडून जाते. ज्यांची नक्कल केली आहे ते शिक्षकही दाद देऊन जातात.

      सध्या कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून हे नातं काहीचं दुरावलं आहे. ऑनलाईनमध्ये तो टच नसतोच. ग्रामीण भागात तर ऑनलाईनही नाही. अशावेळी मुलांच्या गराड्यात दिवस घालवणार्या शिक्षकाची काय अवस्था होत असेल हे मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.

सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन! 🙏

_विजय सावंत




Comments

Post a Comment