कविता- बहीणभावाचं नातं
बहीणभावाचं नातं
दंगामस्ती मारामारी मोठ्याची दादागिरी
घराघरात आमच्या काहीसं असंच असतं
असलं की नको, नसलं की हवं असतं
लहानपणी बहीणभावाचं नातंच वेगळं असतं
तिच्या बाहुलीचा हात त्याने जोडायचा असतो
त्याच्या गाडीचं चाक तिने लावायचं असतं
हसतखेळत रुसतफुगत एकत्र वाढायचं असतं
वाढता वाढता एकमेकांना सावरायचं असतं
हे नातंच काहीसं वेगळं असतं
मोठेपणी एकमेकांना जपणारं असतं
आता ते काहीसं दोस्तीचं असतं
ऑफिसमधून यायला उशीर झाल्यास
नाक्यावर तिची वाट बघणारं असतं
हृदयात तिचं स्थान वेगळच असतं
तिचंही काहीसं असंच असतं
कितीही वरवर वाटलं तरी
खोल खोल रुजलेलं असतं
पहिल्या कमाईची खरेदी फ्रॉक असतं
चेहर्यावरचं हासू तिच्या रॉक असतं
सर्वकाही तिच्यासाठी माफ असतं
बहीण भावाचं नातंच जरा वेगळं असतं
कधी मस्ती कधी स्तुती भांडणही रास्त असतं
लग्न झाल्यावर घर मात्र कसं शांत असतं
आठवणीतच तिच्या आता जगणं जनरीत असतं
घरातलं स्थान मात्र तिचं तसंच असतं
माहेरच्या ओढीने मन वाट बघत असतं
कॅलेंडरचं पान सतत चाळत असतं
रेशमी धाग्याने प्रेम मनगटावर सजत असतं
बहीणभावाचं नातंच जरा वेगळं असतं
सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
_विजय सावंत
२२/०८/२०२१


Mast...
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
DeleteChan
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete👌🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete