कविता- पन्नाशी

 पन्नाशी

चला आज एक आणखी पायरी गाठली

कळलंच नाही कधी मी पन्नाशी गाठली

आयुष्याची माझ्या अर्धी वर्षे लोटली

मस्त डुंबून घ्यायचं आता जी आहेत उरलेली 

काय कमावलं काय गमावलं हिशोब का मांडू

भरभरून जगलेलं उगाच का सांडू

प्रत्येक क्षण आयुष्याचा होता खळखळाट 

लुटलं निसर्गसौंदर्य मी फिरलो मनमुराद

निसर्गाने शिकवलं मला काय असतं औदार्य

माणसाने राखावं सदा त्याच्याशी सौहार्द

नातं जपलं जीवापलीकडे खोटं का बोलू

आठवण नाही काढत म्हणून नका तुम्ही तोलू

सहज सोपं नसतं आयुष्य खरं आहे म्हणणं

त्यातच गायचं आनंदाने आपलं जीवन गाणं

लाख लाख शुभेच्छा तुमच्या असो सदा पाठी

आयुष्याची पुढील वर्षे माझी राहो तरणीताठी


_विजय सावंत

१४/०८/२०२१



Comments

  1. खुप खुप शुभेच्छा मीत्रा!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  2. छान छान आयुष्य किती खडतर किती मऊ
    जो जसे जगतो तो स्वतःसाठी काही करत नसतो भाऊ.
    आयुष्यातला नटरंग जसे पात्र तसा रंग
    कठपुतळीचा खेळ चालवीत आहे
    पांडुरंग पांडुरंग
    फारच चांगले आयुष्याचे वण॔न केले आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  3. खूप छान साहेब. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा🎉🎊

    ReplyDelete
  4. Happy bday मित्रा 😄👍💐💐💐💐

    ReplyDelete
  5. Fabulous fifty!...happy birthday dada🌹🎂

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  6. मित्रा,
    पन्नाशीला गुणिले शुभेच्छा ! 🎂💐

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete

Post a Comment