कवडसा - निसर्ग प्रवास
निसर्ग प्रवास
पावसाने चांगलाच जोर धरलाय. खासकरून तळकोकणात. नुकताच गावी जाण्याचा योग आला. मुंबईहून निघताना पावसाची सोबत होतीच. त्यामुळे प्रवासाचा आनंद अधिक वाढला. कोल्हापूर फोंडा हा अडीच तासांचा प्रवास म्हणजे निसर्गात फिरण्याची हौस भागवून घ्यायची आयती संधी. आणि त्यात राधानगरी ते फोंडाघाट म्हणजे स्वर्ग. कुठल्याही ऋतूत या परिसरात फिरा! इथला निसर्ग वेड लावतो. आणि दाजीपूर म्हणाल तर... कळस! या रस्त्याने जाताना मी कधी तिथे थांबलो नाही असे झाले नाही. इथला निसर्ग म्हणतो मला डोळ्यात भरून घे मगच पुढे जा. मीही त्याला अव्हेरत नाही. काही वेळ तिथे रेंगाळतोच. असं म्हणतात कॅलिफोर्निया खूप सुंदर आहे, पण इथला निसर्ग पाहिला तर कुणीही म्हणेल हेही काही कमी नाही. प्रत्येक ऋतूत काढलेले दाजीपूरचे फोटो तितकेच सुंदर आहेत. पाऊस पडून गेल्यानंतर शरदाच्या चांदण्यात दाजीपूर न्हाऊन निघतं... हेमंतात निळ्या निरभ्र आकाशात मोजकेच पुंजके राखून असतं... शिशिरात पळस सावरीने फुलून निघतं... वसंतात नटतं... ग्रीष्मात दाजीपूरपर्यंत पसरलेलं राधानगरी जलाशयाचं पाणी पार खपाटीला पोचतं. वर्षभर पाण्याखाली असलेली जमीन वर्षाऋतूच्या आगमनापूर्वी जेव्हा उघडी पडते तेव्हा तिचं ते रूप बघण्यासारखं असतं. लाल मातीची बेटं... त्यांना विळखा घालून वाहणारे प्रवाह... पहिल्या पावसानंतर त्या लाल मातीवर पसरलेली हिरवी चादर...आणि त्यावर चरणारी गुरं...!!
ओलवण, हसणे ही राधानगरी जलाशयाच्या पश्चिम काठावर, शेवटच्या टोकावर वसलेली गावे. दाजीपूर हे घाटमाथ्यावरचं चेकपोस्ट. दाजीपूरला आता राहाण्याची सोय करण्यात आली आहे. हे गवा अभयारण्य आहे. इथून जवळच शिवगड आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. ज्या पाण्यात राहून गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती ते झांजेचं पाणी शिवगडाच्या वाटेवर आहे. (त्यावर एक वेगळी पोस्ट पाठवेन.) हा सगळा परिसर निसर्गसंपन्न. इथल्या निसर्गाचे काही फोटो खास तुमच्यासाठी.
विजय सावंत
२७/०६/२०२१
सर्व फोटो- विजय सावंत
२. तरवा लावणीची तयारी
फोडाघाटातून दिसणारे विहंगम दृश्य





















zakass ....
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete👌👌👌
ReplyDeleteफोटोंमुळे लेख अनुभवला. डोळे निवले. 👌🏻🌷🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete