आणि बरंच काही- बाप अनुभवावा बाप जगावा
बाप अनुभवावा बाप जगावा
आजकाल दिवस साजरे करण्याचे दिवस आले आहेत. असो. काही हरकत नाही. त्यानिमित्ताने काहीएक लिहिता येतं. संबंधितांची आठवण काढता येते. आजकाल असंही म्हटलं जातं, ‘काय ते दिवस साजरे करण्याचे फॅड आलंय, वर्षभर कुणाला आठवणही नसते ...!!' खरंय! माणूस इतका व्यग्र झालाय की त्याचे तीनशे पासष्ट दिवस कधी संपतात ते त्यालाच कळत नाही. अशावेळी ‘तो दिवस' विशेष दिन म्हणून साजरा करायला काहीच हरकत नाही. जगभरातून आता हे स्विकारले गेले आहे. त्यामुळे पर्यावरण, नातं, समाज, कालौघात नष्ट होऊ पाहणाऱ्या काही बाबी, यांविषयी जागरुकता निर्माण होते. काही वर्षांनी तीनशे पासष्ट दिवस रोज कुठला न कुठला दिवस साजरा केला जाईल. दिवस कमी पडायला लागतील. खरं तर हे डे प्रकरण विचार करायला लावणारं आहे. हं...!
आज ह्या सर्व डेजचा ‘बाप डे' आहे...फादर्स डे!
माझे बाबा, घाईगडबडीचा विषयच नाही. लिहावं तेवढं कमीच. तरीही या कवितेतून व्यक्त होण्याचा केलेला प्रयत्न.
मला लहान मुलांची बेहद आवड. एखाद्या समारंभात समोरच्या खुर्चीवर, रस्त्यात चालताना, बसस्टॉपवर किंवा कुठेही लहान बाळ दिसले की मी त्याच्या नाकाच्या शेंड्याला तर्जनीने अलगद हळूवार स्पर्श करतो. पहिल्यांदा बुजतं, दुसर्यांदा मान फिरवतं, तिसर्यांदा खुद्कन हसतं, आहाहा! त्याचं ते खुद्कन हसणं हृदयात रुतून बसतं. तरीही एखादं बाळ नाही हसलं तर मी आवरतं घेतो, लोकं वेड्यात काढायच्या आधी. आणि एखाद्याने रडवेला चेहरा करायला घेताच तिथून छू होतो. हे सगळं त्यांच्या आयांच्या, आजींच्या नकळत चाललेलं असतं.
असो, लहान असल्यापासून, शेजार्यांची, बहिणींची, इतर नातेवाईकांची मुलं खेळवून झाली होती. २००१ साली आमचं बाळ...आमची परी... घरी आली. मग काय! दुसरं विश्वच नाही, ते बाळ आणि मी. जगात फक्त आम्हीच बापलेक.
पहिली दोन वर्षे रात्रीची झोप अशी नाहीच... रात्री जागी राहायची, मध्येच सू, शी चालू असायचं.... पहाटे कधीतरी डोळा लागायचा. रात्री झोपता झोपत नसायची. चिऊकाऊ, चंदामामा, पुरे पडेनासे व्हायचे तेव्हा मी माझंच एक न संपणारं गाणं तयार केलं. थोपटता थोपटता बोबल्या बोलात तालात म्हटलेलं ते गाणं ऐकता ऐकता कधी झोपायची कळायचे सुध्दा नाही.
छोटं छोटं बाळ माझं
नन्हं नन्हं बाळ
छोटं छोटं बाळ माझं
नन्हं नन्हं बाळ
शोन्नं शोन्नं बाळ माझं
मुन्नं मुन्नं बाळ
शोन्नं शोन्नं बाळ माझं
मुन्नं मुन्नं बाळ
इवले इवले हात त्याचे
इवले इवले पाय
इवले इवले हात त्याचे
इवले इवले पाय
इवल्या इवल्या पायांची
बोटं इवली इवली
इवल्या इवल्या बोटांची
नखं इवली इवली
इवले इवले डोले त्याचे
इवले इवले कान
इवले इवले ओठ त्याचे
इवले इवले नाक
छोटं छोटं बाळ माझं
नन्हं नन्हं बाळ
शोन्नं शोन्नं बाळ माझं
मुन्नं मुन्नं बाळ
इवले इवले फ्लॉक त्याचे
इवली इवली बाहुली
इवले इवले मौजे त्याचे
इवली इवली खेळणी
इवलं इवलं अंथरून त्याचं
इवलं इवलं पांघरून
इवली इवली उशी त्याची
इवले इवले नॅपकीन
छोटं छोटं बाळ माझं
गुंड गुंड बाळ
शोन्नं शोन्नं बाळ माझं
मुन्नं मुन्नं बाळ
छोटं छोटं बाळ माझं.....
बाळाच्या नजरेतल्या वस्तू ओळींत टाकून बोबड्या बोलीत म्हटलेलं हे गाणं सकाळपर्यंत चालू राहू शकतं...! त्याला ते खूप आवडतं... ते एकाग्र होतं, आणि त्यातच ते झोपून जातं. हे गाणं ऐकल्याशिवाय माझी बाळं कधी झोपली नाहीत. आज एवढी मोठी घोडी झाली, तरी अजूनही कधीतरी लाडात आली की “पप्पा, ते छोटं छोटं बाळ...!"
_विजय सावंत
२०/०६/२०२१



'बाप' Very Touching !
ReplyDeleteलहान मुलाला झोपवण्याचं गाणंही मस्त आणि उपयुक्त. 👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
DeleteGreat very nice.
ReplyDeleteधन्यवाद!🙏
DeleteVijay, va chan. Babanchi aathavan 🙏🙏
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete����
ReplyDeleteEk no viju kaka 👌🏻👍🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
DeleteMast
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteअतिसुंदर लिखाण
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteखूप छान आठवणी
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteVery nice❤️❤️🙌🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteSuperb
ReplyDelete