आणि बरंच काही - शाळा
शाळा
१३ जून, शाळेचा पहिला दिवस. कधी कधी एखाद दुसरा दिवस पुढेमागे.
शाळा...! आयुष्यातल्या आठवणींचा एक हळवा कप्पा. शाळेत केलेली दंगामस्ती, निरागस मैत्री, मधल्या सुट्टीतली धमाल, तो बाक, तो फळा, तो खडू तो डस्टर... आणि ती दहा वर्षे...शाळेनंतरचं पुढील आयुष्य जगताना ते सुखकर जगता यावं, त्या आठवणीत रमता यावं, यासाठी शाळा म्हणजे समाजाकडून करण्यात आलेली सर्वात सुंदर सोय आहे. सुखद आठवणींचं एक गाठोडं आहे. कुणी तिजोरीही म्हणा...! जगाच्या बाबतीत बेफिकिर असलेलं ते वय आपल्याच एका वेगळ्या विश्वात असतं... त्याला दुनियादारीचा अजून स्पर्श झालेला नसतो. म्हणूनच ते वय, ते शाळेतले दिवस, तो निखळ आनंद, आयुष्यात कधीच विसरता येत नाही.
गेलं वर्ष ऑनलाईन' म्हणून गाजलं. प्रत्येक काम ऑनलाईन. शाळाही ऑनलाईन! समोर ठेवून घड्याचं सुंदर चित्र काढता येतं पण तो घडा घडवायला कुंभाराचे हातच हवे. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारी संस्था नसून व्यक्तीमत्व घडवणारं ते मंदिर आहे.
हं...! चला...! एक वर्ष मुलांनी हे सगळं एडजस्ट केलं. पण नवीन शैक्षणिक वर्षातही ऑनलाईनच शिकावं लागणार आहे की काय?, या काळजीने मुलांच्या मनात चाललेली घालमेल या कवितेतून व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न.
विजय सावंत
१३/०६/२०२१
<script data-ad-client="ca-pub-2420490495890015" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>google.com, pub-2420490495890015, DIRECT, f08c47fec0942fa0



छान, आजही वाटते डबा, पाटी दफतर घेऊन शाळेत जावे....
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteशाळा हि फक्त पुस्तकी अभ्यासाची वास्तू नसून व्यक्तीमत्व विकासाचे शिक्षण देणारे मंदिर आहे. 🙏
ReplyDeleteवाचकांचीही कन्सेप्ट छानपणे विकसित करणारी कविता. 👍
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete