कविता- आली दिवाळी
आली आली दिवाळी आली
आज सोनेरी पहाट उगवली
ऋतूरंगात सारी दुनिया न्हाली
रांगोळी छान दारात सजली
आली आली दिवाळी आली
हर्ष उल्हासात कशी दंगली
चिलीपिली, सारी घरातली
प्रसन्न आज गृहलक्ष्मी झाली
आली आली दिवाळी आली
सखे शेजारी सगेसोयरी आली
फराळाची जंगी पंगत उठली
लाडू करंजी शेव अन् चकली
आली आली दिवाळी आली
वाट पाहुनि ताई थकली
भाऊबीजेला आज ती नटली
नात्यांच्या या सोहळ्यात रमली
आली आली दिवाळी आली
ज्योत ज्योत अंगणी उजळली
प्रकाश दारी उधळत आली
श्र्वास नवा घेऊन आली
आली आली दिवाळी आली
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
विजय सावंत
दीपावली २०२०



दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, लिखाण नेहमीप्रमाणेच छान
ReplyDeleteKhup Sundar... Diwali cha hardik shubhechchha
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete*शुभ दीपावली आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* !!! 🙏
ReplyDelete*अमित घाटये आणि परीवार*
💥🪔💥🪔💥🪔💥🪔